मुंबई – बॉलिवूडची दबंग गर्ल म्हणून सोनाक्षी सिन्हाने सर्वांच्या मनात घर केले आहे. सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असलेली सोनाक्षी अनेकदा वेगवेगळ्या स्टाइलमध्ये फोटो शेअर करून चाहत्यांना वेड लावते. नुकतंच तिचा शाही अवतार पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.एरवी स्लिवलेससह होत ड्रेस मध्ये दिसणारी सोनाक्षी यावेळी खूपच वेगळा लूक घेऊन चाहत्यांसमोर आली आहे.
सोनाक्षीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर हिरव्या रंगाच्या जबरदस्त अनारकली सूटमध्ये तिचा शाही लूक शेअर केला आहे. सोनाक्षीला या अवतारात तुम्ही याआधी क्वचितच पाहिले नसेल. सोनाक्षीचा हा लूक फक्त स्टायलिशच नाही तर खूप अट्रासिटीव्ह आहे. म्हणूनच तिच्या या सौंदर्यापुढे अनेक चाहते पूर्णपणे घायाळ झाले आहेत.
सोनाक्षीचा हा ट्रॅडिशनल लूक चाहत्यानं चांगलाच आवडला आहे, अनेकानी यावर,कितीला घेतला ?’ अशा कमेंट करत चक्क तिला आपल्या ड्रेसची प्राईज देखील विचारली आहे. सोनाक्षी शेवटची भुज – द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात दिसली होती. यानंतर आता सोनाक्षी ‘निकिता रॉय अँड द बुक ऑफ डार्कनेस’मध्ये दिसणार आहे.