“दबंग- 3’मधील सोनाक्षी सिन्हाचा फर्स्ट लूक

मुंबई – बॉलीवूडमधील चुलबूल पांडे अर्थात सलमान खानच्या बहुचर्चित “दबंग-3′ चित्रपटाच्य शूटिंगला प्रारंभ झाला आहे. काही दिवसांपूर्वी सलमानने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. आता चित्रपटातील सोनाक्षी सिन्हाचा लूक समोर आला आहे. सोनाक्षीने सोशल मीडियावर तिचा सिनेमातील लूकचा फोटो शेअर केला आहे.
सोनाक्षीचा “दबंग-3′ मधील लूक “दबंग’ चित्रपटातील लूकशी मिळता-जुळता आहे. दबंग-3 मधील सोनाक्षीचा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत सोनाक्षीने कॅप्शन लिहीले की, “रज्जो पुन्हा आली आहे!!! दबंग ते दबंग- 3… ही घरवापसी आहे. आज माझा शूटिंगचा पहिला दिवस आहे. मला विश करा..’
फर्स्ट लूकमध्ये सोनाक्षी गुलाबी साडीत सुंदर दिसत आहे. काही तासातच सोनाक्षीच्या या फोटोला लाखो लाईक्‍स मिळत आहेत. तसेच सोनाक्षीचे चाहते तिचा हा फोटो शेअरही करत आहेत.

याआधी सलमानने “दंबग-3’च्या सेटवरुन पहिला फोटो शेअर केला होता. या फोटोत सलमानने आपल्या शर्टच्या कॉलरच्या मागे गॉगल लावला आहे. दबंग चित्रपटातील सलमानची ही स्टाईल लोकांना खुप आवडली होती. या फोटोत सलमानसोबत प्रभू देवाही दिसत आहे.

दबंग चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभू देवा करणार आहे. दबंग सीरिजचा पहिला चित्रपट 2010 मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्याचे दिग्दर्शन अनुराग कश्‍यप याने केले होते. तर “दबंग-2’चे दिग्दर्शन अरबाज खानने केले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.