दिवंगत राजीव सातव यांच्या मुलाला दहावीत 98.33 टक्के; सुप्रिया सुळेंचं भावनिक ट्वीट

मुंबई –  काँग्रेसचे दिवंगत तरुण व तडफदार नेते राजीव सातव यांचा मुलगा पुष्कराजनं दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे. आजच (ICSE) बोर्डाचा निकाल जाहीर झाला.

त्यात पुष्कराज राजीव सातव ला 98.33 टक्के एवढे गुण मिळाले आहेत. त्याच्या या यशाबद्दल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत अभिनंदन केलं आहे.

“राजीव सातव आज असते तर त्यांना आपल्या मुलाचं यश पाहून खुप आनंद झाला असता. राजीव आणि प्रज्ञा यांचा मुलगा पुष्कराज याने इयत्ता दहावीच्या परीक्षेत (ICSE) 98.33 टक्के गुण मिळविले.

त्याच्या या यशाबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन. पुष्कराज, खुप मोठा हो ! आम्हा सर्वांना तुझा अभिमान वाटतो.’ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहे.

राजीव सातव हे काँग्रेसचे राज्यसभा खासदार होते. त्यांना करोना झाला आणि पुण्यात ते जवळपास महिनाभर करोनाशी झुंज देत होते. अखेर त्यांचं 16 मे रोजी पुण्यात निधन झालं.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.