सोमेश्वरनगर (प्रतिनिधी) – सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथील आजी-माजी सैनिक संघ यांच्या तर्फे प्रांताधिकारी, तहसीलदार यांचेकडे १२ आवश्यक किराणा वस्तू असलेले १११ किट देण्यात आले.
गरजूंना उपयोगी पडतील अशा वस्तूसह तहसिलदार कार्यालय, बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक आण्णासाहेब घोलप, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांचे कार्यालयात पोलिंसाना प्रत्येकी कार्यालयात पाच लिटर सॅनिटायझर देण्यात आले.
आजी माजी सैनिक संघटनेद्वारे या अगोदर देखील १२५ कुटुंबाना धान्य व किराणा घरपोच वाटप केले आहे . सदर वाटप प्रमोद काकडे, वडगाव चे ए. पी. आय सोमनाथ लांडे यांचे उपस्थित देण्यात आली होती. सैनिक संघटनेच्या बचत गटानी देखील यासाठी मदत केली.
बारामती मधे सदर किट तहसीलदार याना संघाचे संस्थापक जगन्नाथ लकडे , कायदेशीर सल्लागार ॲड. गणेश आळंदीकर ,अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर ,उपाध्यक्ष विठ्ठल भापकर व सचीव अनिल शिंदे ईत्यादी सैनिक उपस्थीत होते .