देहूरोड, (वार्ताहर) – लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल अजयकुमार सिंह यांच्या हस्ते पुणे परिसरातील लष्करी जवानांना शौर्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले. देहूरोड येथील केंद्रीय आयुध भांडार डेपोला ८२ व्या वर्षात प्रथमच ‘जीओसी इन सी- अँप्रिशिएशन युनिट’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात प्रशासकीय अधिकारी कर्नल मनोज सक्सेना, लष्करी अधिकारी, सैनिक व डेपोतील कामगार उपस्थित होते. डेपोतील सर्व युनियनच्यावतीने कमांडंट ब्रिगेडियर शर्मा यांचा फेटा बांधून व शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
लष्कराच्या दक्षिण मुख्यालयात देहूरोड येथील केंद्रीय आयुध भांडार यासह २९ युनिटस व लष्करी कमांडंट ब्रिगेडियर मनोज कुमार शर्मा यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भक्ती-शक्ती स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
डेपोला पुरस्कार मिळाल्याबद्दल ब्रिगेडियर शर्मा यांनी कामगारांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या व जवानांना गौरविण्यात आले. या ऐतिहासिक कार्यक्रमात डेपोचे कमांडंट ब्रिगेडियर मनोज कुमार शर्मा यांनी हा गौरव स्विकारला. त्यानिमित्ताने, लष्करी बँडसह मिलिटरी लाईनपासून डेपोपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यात कामगार वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.