आकाश आणि झेन यांची शौर्य पुरस्करसाठी निवड

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी रोजी  दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील दोघांची राष्ट्रीय शौर्य पुरस्करसाठी निवड करण्यात आली आहे. औरंगाबादच्या आकाश खिल्लारे आणि मुंबईची झेन सदावर्ते या दोघांना 26 जानेवारी रोजी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळणार आहे.

औरंगाबादच्या  आकाश खिल्लारे यांनी नदीत बुडणाऱ्या मायलेकींचा जीव वाचवला आईचा जीव वाचवला होता. आकाश शाळेत जात असताना त्यांना नदीत बुडणाऱ्या मायलेकी दिसल्या. आकाश यांनी सत्तर फूट खोल नदीत उडी घेऊन दोघी मायलेकींनी पाण्याबाहेर काढले.

मुंबईत हिंदमाता परिसरातील क्रिस्टल टॉवर इमारतीला आग लागली. या आगीतून झेन सदावर्तेने यांनी तेरा जणांचे प्राण वाचवले होते. आग लागली तेव्हा झेन सदावर्ते यांनी प्रसंगावधान राखत सर्वांच्या तोंडावर सुती कापड बांधले होते. आगी दरम्यान धुराचे लोट निर्माण होतात. त्यातून वाचण्यासाठी ओला कापड तोंडावर बांधल्यास धूर नाकात जात नाही. देशात अशा 22 जणांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यात 10 मुली आणि 12 मुले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.