सोलापूर – विद्युत ठेकेदाराचा परवाना देण्यासाठी पंधरा हजाराची लाच घेताना सहायक विद्युत निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे. फैजुलअली मेहबूब मुल्ला असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सोलापुरातील अंत्रोळीकर नगरातील विद्युत निरीक्षक कार्यालयात ही करावाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, निरीक्षक कार्यालयात इलेक्ट्रिकलची कामे घेण्याकरिता नवीन फॉर्म देण्याचे काम सुरू होते. तक्रारदाराने आवश्यक असणारा विद्युत पर्यवेक्षक परवाना तसेच विद्युत ठेकेदार परवाना मिळवण्यासाठी विद्युत निरीक्षक विभाग, सोलापूर येथे अर्ज केला होता. विद्युत ठेकेदार तक्रारदार परवाना मिळवण्याकरिता पाठपुरावा करीत होता. परवान्यासाठी तक्रारदाराकडे विद्युत निरीक्षकाने 32 हजार रुपयांच्या लाचेची मागणी कली. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने विद्युत निरीक्षक कार्यालयात सापळा रचून 15 हजार रुपये स्वीकारताना फैजुलअल्ली मेहबूब मुल्ला यास रंगेहाथ पकडले.