सोहेल पठाण करणार राष्ट्रवादीत प्रवेश

धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत करणार प्रवेश 

जामखेड: सोहेल पठाण यांचा अनेक दिवसांपासून रेंगाळलेला प्रवेशाला मुहूर्त लागला असुन उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश होणार असल्याचे जमिर सय्यद यांनी सांगितले

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पठाण हे भाजपात प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ बांधण्याची भुमिका स्पष्ट केली असून उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ जामखेड शहरात होणाऱ्या सभेत धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.