काही लोकांचे घड्याळाचे काटे बंद पडलेत- उद्धव ठाकरे

सांगली : कर्जमाफी हा शब्द आवडत नाही, त्यामुळे आपल्याला शेतकरी कर्जमुक्ती करायची आहे, असे मत शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केले. तसेच काही लोकांचे घड्याळाचे काटे बंद पडलेत. अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटलांच्यावर यावेळी टीका केली.

ते इस्लामपूरमध्ये बोलत होते. इस्लामपूर मतदार संघातील महायुतीच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांची इस्लामपूर मध्ये सभा पार पडली आहे. यासभेसाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, भाजपचे खासदार संजयकाका पाटील, शिवसेना खासदार धैर्यशील माने, उमेदवार गौरव नायकवडी यांच्यासह मान्यवर व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी काही लोकांचे घड्याळाचे काटे बंद पडलेत. अशी टीका उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्यावर केली आहे. तसेच सदाभाऊ तुम्हाला कधी ताकत कमी पडू देणार नाही. मी शहरी बाबू आहे, मला शेतीतल काही कळत नाही. पण मला फक्त शेतकऱ्यांचे अश्रू दिसतात, तसेच मला कर्जमाफी शब्द आवडत नाही, मला शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करायची आहे असे मत व्यक्त उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.