मुंबई – मराठीत चित्रपटात काम करून आपल्या अभिनय करिअरला सुरुवात केल्यानंतर सई ताम्हणकरने बॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप उमटवली.
‘गजनी’सारख्या मोठ्या चित्रपटात छोटी भूमिका साकारत सईने आपल्या हिंदीतील अभिनयाला सुरुवात केली.त्यानंतर अनेक दर्जेदार हिंदी सिनेमांमध्ये ती दिसून आली. बोल्डनेसमुळे सई नेहमीच चांगलीच चर्चेत राहते.
सईचा बोल्ड फोटो ती स्वतः इंस्टाग्रामवर शेअर करत असते. अशातच तिने नुकताच सोशलवर फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्टिव म्हणून तिने संडे पिक्चर्स’ असे लिहिले आहे. तिच्या याच फोटोवरून आता तिला ट्रोल केलं जात आहे.
एकाने तिच्या बसण्याच्या पद्धतीवर टीका केली आहे, एक युजर्सने तिची तुलना चक्क ‘पालीशी’ केली आहे. तिच्या या फोटोवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहे.
सई नुकतीच‘इंडिया लॉकडाऊन’ चित्रपटात झळकली होती. २ डिसेंबर २०२२ रोजी झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित झाला. सई व्यतिरिक्त प्रतीक बब्बर, श्वेता बासु प्रसाद, आहाना कुमरा आणि प्रकाश बेलवाडी या कलाकारांनी काम केले आहे.