राज ठाकरेंच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल
पुणे: राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेचे नाट्य महाराष्ट्रासह संपूर्ण देशाने पहिले आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येण्याच्या सगळ्या हालचाली पूर्ण झालेल्या असताना, अजित पवारांनी बंड करत उपमुख्यमंत्री पदाची शपत घेतली अन राज्यात एकच खळबळ उडाली. हे संपूर्ण सत्ता नाट्य सुरु असताना राज ठाकरे मात्र कुठेही पाहायला मिळाले नाही.
परंतु आता राज ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्यातील एका भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. या व्हिडिओत राज यांनी अजित पवारांवर कडाडून टीका केलेली आहे. तसेच त्यांच्याकडून वारंवार करण्यात येणाऱ्या बंडाचाही चांगलाच समाचार घेतला आहे.
सध्या अजित पवारांनी राष्ट्रवादीत परत यावे यासाठी पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु त्यांची मनधरणी करण्यात कुणालाही यश येत नसल्याचे पाहायला मिळत आहे.