मुंबई – कोरोना विषाणूने साऱ्या जगात धुमाकुळ घातल्यानंतर आता चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या घरातही शिरकाव केला आहे. बॉलिवूडचे महानायक म्हणजेच अभिनेते ‘अमिताभ बच्चन’ आणि त्यांचा मुलगा अभिनेता ‘अभिषेक बच्चन’ यांना कोरोनाची बाधा झाली आहे.
यानंतर सोशल मीडियावर यानंतर ट्विटवर अमिताभ यांना या आजारामधून लवकर बरं होण्यासाठी अनेकांनी प्रार्थना केली असून अमिताभ आणि अभिषेकला गेट वेल सूनच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
तर दुसरीकडे उस्मानाबाद जिल्ह्यातील एका गावात करोनाविषयी जनजागृती करण्यासाठी लावण्यात आलेले अमिताभ बच्चन यांचे होर्डिंग्स हटविण्यात आले आहेत. कारण
हे होर्डिंग्स ‘जिस डॉन को पकडना मुश्किल ही नहीं, बल्कि नामुमकिन था, उसे कोरोना वायरस ने पकड लिया… ‘अशा आशयाचे होते. त्यामुळे बिग बींच्या चाहत्यांच्या भावना दुखावल्यामुळे हे होर्डिंग्स हटविण्यात आल्याचं इंग्रजी वृत्त पत्राने वृत्त दिले आहे.