मुंबई – बॉलिवूडला आणखी एक मोठा झटका बसला आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक रजत मुखर्जी यांचं पहाटे निधन झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मूत्रपिंडासंबंधीत तक्रारी जाणवू लागल्यामुळे उपचार घेतल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, पुन्हा प्रकृतीत बिघडल्यामुळे त्यांनी पहाटे अखेरचा श्वास घेतला.
My friend and director of Road ,Rajat Mukherjee passed away in the early hours today in Jaipur after a long battle with illness!!! Rest in peace Rajat !!Still can’t believe that we will never meet or discuss our work ever again.khush reh jaha bhi reh.🙏🙏🙏
— manoj bajpayee (@BajpayeeManoj) July 19, 2020
‘प्यार तूने क्या किया’, ‘रोड’, ‘लव इन नेपाल’, ‘उम्मीद’ या सारख्या चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं.
त्यांच्या निधनानंतर मनोज वाजपेयी, हंसल मेहता आणि अनुभव सिन्हा यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.