…म्हणून आहारात बीट आणि गाजर असायलाच हवे

चौरस आहार असेल तर आरोग्याच्या बऱ्याच तक्रारी नकळत दूर होतात. आरोग्य उत्तम राहण्यास आहार आणि व्यायाम यांचा महत्त्वाचा वाटा असतो. भाजी, आमटी, भात, पोळी यांबरोबरच आहारात सॅलेडचा समावेश असणे आवश्‍यक असते. हे सॅलेड कच्चे, उकडून किंवा कोशिंबीर स्वरूपात खाता येते.

जेवणात याचा समावेश असणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात तसेच पचनशक्ती सुधारण्यास आणि शरीराराला आवश्‍यक ते घटक मिळण्यास मदत होते. सॅलेडमध्येही काकडी, टोमॅटो, मुळा यांबरोबरच गाजर आणि बीट यांचाही समावेश होतो. या दोन गोष्टी आरोग्याला कशाप्रकारे फायदेशीर असतात पाहूया…

श्रबीटमुळे शरीरातील रक्ताची पातळी योग्य राहण्यास मदत होते. तसेच शरीरातील साखरेची पातळीही कायम राहते.
श्रगाजर आणि बीट या दोन्हीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने खाल्लेल्या अन्नाचे पचन योग्य पद्धतीने होण्यास मदत होते. त्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.

श्रबिटात लोहाबरोबरच सोडियम, पोटॅशियम, फॉस्फरस असे शरीरासाठी आवश्‍यक असणारे घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे आहारातील बिटाचा समावेश आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतो.

श्रगाजरात कॅल्शियम, फायबर तसेच क आणि अ जीवनसत्त्व असते. अ जीवनसत्त्वामुळे डोळ्याचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

श्रआपल्यातील अनेकांना हे माहीत नसेल पण बीट तसेच गाजर यांमुळे हृदयाशी निगडित समस्या कमी होण्यास मदत होते.

श्रथंडीत गाजराचं सेवन केल्यानं शरीरात ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे शक्ती टिकून राहते आणि आपण अधिक कार्यक्षम होतो.

श्रबिटातील अँटीऑक्‍सिडंटस्‌ आणि व्हिटॅमिन सी तसेच खनिजे यांमुळे त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते. त्वचा टवटवीत आणि तजेलदार राहण्यास मदत होते.

श्रबिटातील कॅल्शियममुळे हाडे आणि दात तर मजबूत होतातच, पण पचनशक्ती सुधारण्यासही मदत होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.