मुंबई : सारा अली खान अलीकडेच मुंबईतील मिठीबाई कॉलेजमधील “क्षितीज’ या फेस्टिव्हलला उपस्थित राहिली होती. यावेळी ती “अतरंगी रे’मधील “चका चक’ हे गाणे लॉंच करणार होती. कॉलेजमधील कार्यक्रम संपल्यावर ती आपल्या कारकडे जात असताना अचानक थांबली
आणि तिने तिथे उपस्थित असलेल्या फोटोग्राफर्सकडे थोडी चौकशी केली. “मघाशी कोणाला पाडले होते?’ त्यावर “जो पडला तो निघून गेला,’ असे उत्तर तिला मिळाले.
View this post on Instagram
त्यावर “तो जो कोणी होता, त्याला सॉरी म्हणा प्लिज’ असे सांगून सारा निघून गेली. झाले असे होते की कार्यक्रमाच्यावेळी साराचे फोटो काढायला आलेल्या फोटोग्राफर्सपैकी एकाला साराच्या सिक्युरिटीने इतक्या जोरात मागे ढकलले होते की तो खाली पडला होता. हे साराच्या लक्षात आले होते.
पण त्यावेळी ती काही बोलली नव्हती. आपल्या सिक्युरिटीचे हे वागणे तिला निश्चितच आवडले नव्हते. त्यामुळे जाताना मुद्दाम थांबून तिने त्या फोटोग्राफरची चौकशी केली. “अतरंगी रे’चा ट्रेलर
मागच्याच आठवड्यात रिलीज केला गेला. अक्षयकुमार आणि धनुष हे दोघेही साराबरोबर दिसणार आहेत. 24 डिसेंबरला हा सिनेमा डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.