मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार आहे कॅप्टन्सी टास्क. पुढच्या आठवड्यात घराचा कॅप्टन कोण बनणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. घरातील प्रत्येक सदस्य यासाठी खूप मेहनतीने तयारी करणार हे निश्चित !
बघूया कोण बनणार पुढील आठवड्यात घराचा कॅप्टन. टास्क दरम्यान सदस्यांमध्ये राडे, वादविवाद, धक्काबुक्की आणि भांडण झाली नाही तर टास्क पूर्ण कसा होणार नाही का ?
टास्कमध्ये जय – मीरा VS गायत्री असं चित्र दिसणार आहे. यांच्यातील वाद काही संपायचे नावं घेत एकंदरीत असे दिसतं आहे.
बिग बॉस यांनी आज जाहीर केले, आता वेळ आहे कॅप्टन पदाचे नवे उमेदवार निवडण्याची…” नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसते आहे टास्कदरम्यान जय गायत्रीला म्हणताना दिसणार आहे,
गायत्री दातार तू भेडचाल मध्येच खेळतेस.. त्यावर गायत्रीचं उत्तरं, चोराच्या उलट्या बोंबा… मीरा पण लगेच म्हणाली, कोणाच्या मागे बुगुबुगू करतेस ना हे कळतं. गायत्रीला राग अनावर झालं आणि ती मीराला म्हणाली, अगं निघ गं… तू हड…