न्युयॉर्क : पाकिस्तानची अर्थव्यवस्था किती हलाख्याची झाली आहे हे सर्वच जगाला माहिती आहे. त्याचीच प्रचिती अमेरिकेत पुन्हा एकदा आली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे स्वत:चे विमान नसल्यामुळे त्यांच्यावर प्रवासी विमानाने आपल्या मायदेशी जाण्याची वेळ आली. दरम्यान, सौदी अरबने पाकिस्तानला एक विमान भेट म्हणून दिले होते. त्यातही तांत्रिक अडचण आली त्यामुळे खान यांना प्रवासी विमानाने जावे लागणार आहे.
After hours-long delay, Imran Khan departs for Pakistan on commercial aircraft
Read @ANI Story | https://t.co/d3DE78NMen pic.twitter.com/6hFpM50BVB
— ANI Digital (@ani_digital) September 28, 2019
पाकचे पंतप्रधान इम्रान खान हे अमेरिकेच्या दौऱ्यावर होते दौरा आटोपून ते मायदेशी परतण्यास निघाले होते. सौदी अरबकडून भेट म्हणून देण्यात आलेल्या विमानाने जाण्यास ते निघाले असता त्यांच्या विमानात काही तांत्रिक अडचण आली आणि विमानाची इमर्जन्सी लॅंडिग करण्यात आली. त्यामुळे इम्रान खान यांना प्रवासी विमानाचा आधार घेत मायदेशी जावे लागणार आहे. इम्रान खान आणि त्यांचे प्रतिनिधी मंडळ स्थानिक वेळेनुसार दुपारी दोन वाजता न्युयॉर्कवरून जेद्दाकडे निघाले होते. जेद्दामध्येच त्यांच्या विमानाला सकाळी आठ वाजता तांत्रिक अडचण आली आहे. त्यामुळे आता काही वेळ जेद्दामध्ये विश्रांती घेवून ते संध्याकाळी प्रवासी विमानाने मायदेशी जाणार आहेत.