पणजी- मॉडेल पूनम पांडे आणि तिचा पती सॅम बॉम्बे या दोघांना कलांगुट पोलिसांनी आज अटक केली. ते दोघे सिकेरी येथे एका रिसॉर्टमध्ये राहत होते. त्या दोघांवरही काणकोण पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
त्यांना काणकोण पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. काणकोणच्या पाटबंधारे खात्याच्या चापोली धरणावर वादग्रस्त मॉडेल पूनम पांडे हिने शूट केलेला पॉर्न व्हिडिओ पोलिसांना चांगलाच भोवला आहे.
हा व्हिडीओ शूट होताना पूनमला संरक्षण दिल्याचा आरोप ठेवून काणकोणचे पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्यासह 5 जणांना निलंबित करण्यात आले आहे.
काणकोण पोलीस स्थानकावर पूनम पांडे आणि तिचा पती सॅम बॉम्बे या दोघांविरुद्ध अश्लील व्हिडीओ शूट करणे आणि सरकारी मालमत्तेत घुसखोरी करणे या आरोपाखाली गुन्हा नोंदवण्यात आला.