मुंबई – भांडण, प्रेम, द्वेष आणि स्पर्धा या सगळ्यांचं मिश्रण असलेला सर्वांचा लाडका रिएलिटी शो बिग बॉस 3 चे तिसरे पर्व सध्या एकदम तुफान सुरु आहे. भांडण, टास्कदरम्यान होणारे वाद, दररोज येणारे ट्वीस्ट यामुळे यंदाचा सीजन चांगलाच चर्चेत ठरत आहे.
लवकरच बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वातील विजेता जाहीर होणार आहेत. मात्र, त्या पूर्वीच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक ‘महेश मांजरेकर’ यांनी या शो मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
View this post on Instagram
नुकतंच बिग बॉसच्या घरात एलिमिनेशन राऊंड पार पडला. यात गायत्री दातारने बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतली. पण यावेळी बिग बॉसच्या चावडीदरम्यान महेश मांजरेकर दिसले नाहीत. मांजरेकर यांच्याजागी आता अभिनेता सिद्धार्थ जाधव हे सूत्रसंचालकाची भूमिका बजावताना दिसले होते.
महेश मांजरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्याच्या कारणामुळे त्यांनी हा कार्यक्रम सोडला आहे. सध्या त्यांची तब्येत चांगली नसल्यामुळे त्यांना हा शो मध्येच सोडावा लागला आहे. त्यामुळे आता सिद्धार्थ जाधव यांच्या खांद्यावर या कार्यक्रमाची जबाबदारी आली आहे.