विकी कौशल आता त्याच्या लग्नाच्या गडबडीतून रिकामा होतो आहे. थोड्याच दिवसात तो पुन्हा एकदा कामाला सुरुवात करेल. दरम्यान त्याच्या” ‘सॅम बहादुर’बाबत एक अपडेट झाला आहे. फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा या दोघींची या सिनेमात एन्ट्री झाली आहे.
“सॅम बहादूर’ची डायरेक्टर मेघना गुलजारच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या दोघांच्या रोलबाबतची घोषणा करण्यात आली आहे. देशाचे पहिले फिल्डमार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर “सॅम बहादूर’ होतो आहे आणि सॅम माणेकशॉ यांची भूमिका विकी कौशल साकारणार आहे.
या सिनेमात फातिमा सना शेख माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा रोल साकारणार आहे. यापूर्वी अक्षय कुमारच्या “बेलबॉटम’मध्ये लारा दत्ताने इंदिरा गांधींचा रोल केला होता. तर सान्या मल्होत्रा सॅम माणेकशॉ यांची पत्नी सिल्लू माणेकशॉ याची भूमिका करणार आहे. आपापल्या रोलबद्दल दोघीही एकदम खूष आहेत.
विकी कौशलनेही या दोघींची निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. माणेकशॉ परिवारामध्ये दोघींचे स्वागत आहे, असे त्याने म्हटले आहे. 1971 च्या युद्धानंतर सॅम माणेकशॉ यांची चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदावरून फिल्ड मार्शल पदी बढती झाली होती.