हिमाचल प्रदेश – हिमाचल प्रदेश आणि काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे. बर्फवृष्टीमुळे संपूर्ण परिसरात बर्फाची चादर पसरली आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटनस्थळांवर गर्दी पाहायला मिळत आहे.
हिमाचल प्रदेशात शुक्रवारी सकाळी गोठवून टाकणारी थंडी अनुभवायला आली. अनेक टिकाणी पारा शुन्य अंशाखाली होता, असे हवामान खात्याने सांगितले. बर्फवृष्टी झाल्याने राज्यातील 900 मार्गावरील वाहतूक बंद पडली.