जम्मू काश्मीर – सध्या जगभरात करोना व्हायरसने थैमान घातले आहे. करोनामुळे मृत पावलेल्यांच्या संख्येत वाढ होतच आहे. सारे जग करोनाच्या सावटाखाली वावरत आहे. अशातच पाकिस्तानकडून जम्मू काश्मीर येथील राजौरीमध्ये सुंदरबनी परिसरात (एलओसी) मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात करण्यात आला आहे. भारतीय सैनिकांकडून याचं चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. पण या चकमकीत भारताचे 6 जवान जखमी झाले असल्याचे माहिती येत आहे.
पाकिस्तानकडून या गोळीबारदरम्यान फेकण्यात आलेला गोळा भारतीय सैन्याच्या पोस्टजवळ पडल्याने जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमीमध्ये 4 जवान आणि 2 बीएसएफच्या जवानाचा समावेश असून त्यांना उपचारासाठी तात्काळ रूग्णलयात दाखल करण्यात आलं आहे.