बंगळुरू – वाहनांचे सुटे भाग निर्माण करणाऱ्या बॉश कंपनीला चौथ्या तिमाहीत 482 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गेल्या वर्षी चौथ्या तिमाहीत झालेल्या नफ्यापेक्षा हा नफा सहापट जास्त आहे.
गेल्या वर्षी चौथ्या तिमाहीत कंपनीला केवळ 81 कोटी रुपयांचा नफा झाला होता. बॉश कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सौमित्रा भट्टाचार्य यांनी सांगितले की, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये सर्वसाधारण वाहन कंपन्याकडून मागणी कमी असली तरी ट्रॅक्टर कंपन्याकडून मागणीत वाढ झाली आहे.
आगामी काळामध्ये परिस्थिती वेगाने सुधारण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. या वर्षी कंपनी दोनशे कोटी रुपयांचा भांडवली खर्च करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळामध्ये मागणी कमी- जास्त होण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीमध्ये पुरवठासाखळी विचलित होऊ शकेल.पुरवठासाखळी शक्य तितक्या लवकर नियमित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे भट्टाचार्य यांनी सांगितले.