अमृतसर : पंजाबमधील नवाशहर येथे मरण पावलेल्या कोरोनाबाधित वृध्दाच्या कुटुंबियांपैकी सहा जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. मरण पावलेल्या वृध्दाच्या कुटुंबियांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्या सहा जणांचे नमुने पॉझिटिव्ह आल्याचे राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
मृत करोनाबाधिताची तीन मुले, दोन सुना आणि एका नातीच्या चाचणीचे निकाल सकारात्मक आले आहेत. कोरोनाचे 12 बाधीत असल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. तर देशातील बाधितांच्या संख्यने 300 चा टप्पा ओलांडला आहे.
या विषाणूच्या बाधेचे सामुहिक संक्रमण रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या पब्लिक कर्फ्यू जाहीर केला आहे. त्याबाबत जनतेमध्ये औत्सुक्याची भावना आहे.