पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज सहा करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर 108 नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. शहरामध्ये आजपर्यंत 88986 जणांना करोनाची लागण झाली आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, आज चार वाजेपर्यंत शहरातील 108 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. सद्यस्थितीत शहरात 877 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 145 रुग्णांचाही समावेश आहे.
मंगळवारी दिवसभरात सहा रुग्णांचा मृत्यू झाला. शहरातील चिंचवड, निगडी, भोसरी येथील चार जणांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील देहूगाव व शिरूर येथील दोघांचा मृत्यू झाला.
आज दिवसभरात 151 रुग्णांना घऱी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 86035 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 1864 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अद्याप 689 रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.