नगर, (प्रतिनिधी) – पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानूर येथील दरोडाप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सहा आरोपी जेरबंद केले आहेत. या घटनेत १३ आरोपींचा समावेश असून ७ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. यातील तुकाराम धोंडीबा पवार, (रा. पाथर्डी) हा चोरी करणे करीता आगोदर बोलावुन घेऊन कोठे चोरी करायची ते ठिकाण दाखवायचा.
त्यानंतर चोर रात्रीचे वेळी जाऊन चोरी करायचे. तसेच चोरी केलेले सोने पवार याचेकडे दिल्यानंतर तो काही दिवसांनी त्याचे पैसे देत असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. तसेच आरोपींकडून ८ लाख १७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
आजिनाथ भागीनाथ पवार (वय २६, रा. आर्वी, ता. शिरुर कासार, जि. बीड), गणेश रामनाथ पवार (वय २५, रा. ब्रम्हगव्हाण, ता. पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर), विनोद बबन बर्डे (वय २७, रा. वारणी, ता. शिरुर कासार, जिल्हा बीड), अविनाश काशिनाथ मेहेत्रे (वय २८, रा. कुळधरण रोड, कर्जत), अमोल सुभाष मंजुळे (वय २३, रा. वडगांव पिंपरी, ता. कर्जत), असे ताब्यात घेतलेल्या आरोपींचे नाव आहे.
तसेच त्यांना पळुन गेलेल्या व्यक्तींचे नाव विचारले असता विनोद बर्डे, संदीप बबन बर्डे (रा. शिरुर कासार, जि.बीड), पप्पु उर्फ राहुल दिलीप येवले, अक्षय सुरेश पवार (रा. वडगांव तनपुरा, ता. कर्जत, असे पळून गेलेल्यांची नावे आहेत. तसेच बाबासाहेब भवर (रा. वडगांव, ता. पाथर्डी (फरार), विशाल जगन्नाथ मंजुळे (रा. वडगांव तनपुरा, ता. कर्जत), भारत फुलमाळी (रा. वारणी, ता. शिरुर कासार, जि. बीड),
विकास उर्फ हरी पोपट सुळ रा. वडगांव तनपुरा, ता. कर्जत), यांचे सोबत गुन्हा केल्याची सांगितले. तर तुकाराम धोंडीबा पवार, हा आम्हाला चोरी करणे करीता आगोदर बोलावुन घेवुन कोठे चोरी करायची ते ठिकाण दाखवतो व त्यानंतर आम्ही रात्रीचे वेळी जावुन चोरी करतो. व चोरी केलेले सोने तुकाराम पवार याचेकडे दिल्यानंतर तो काही दिवसांनी त्याचे पैसे देतो,असे सांगितले. आरोपी तुकाराम धोंडीबा पवार हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द जिल्ह्यात खुनाचा प्रयत्न, चोरी व इतर कलमान्वये ९ गुन्हे दाखल आहेत.
फिर्यादी बाबासाहेब उत्तम ढाकणे (वय ७४, रा. अंबिका नगर, टाकळी मानूर, ता. पाथर्डी) हे कुटूबिंयासह घरात झोपलेले असताना २० ते २५ वयाचे अनोळखी ८-९ इसमांनी घरात प्रवेश करुन फिर्यादी व त्यांचे कुटूबियांना लाथाबुक्यांनी मारहाण करुन, सत्तुरचा धाक दाखवुन घरातील 66 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या तांत्रिक विश्लेशनाच्या आधारे, हा गुन्हा संदीप बर्डे याने त्याच्या साथीदारासह केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. व ते पुन्हा कोठेतरी चोरी करण्यासाठी त्यांचेकडील पांढरे रंगाची पिकअपमधून पाथर्डीतून मोहटादेवी रोडने जाणार आहेत अशी माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने तीन पथके तयार करून मिळालेल्या माहितीनुसार आरोपीस मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
ही कारवाई गुन्हे शाखेतील सपोनि हेमंत थोरात, तुषार धाकराव, सोपान गोरे, मनोहर शेजवळ व पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, रवींद्र कर्डिले, दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, विशाल दळवी, पंकज व्यवहारे, अतुल लोटके, गणेश भिंगारदे, विजय ठोंबरे, संतोष खैरे,
संदीप चव्हाण, राहुल सोळुंके, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, रोहित मिसाळ, अमृत आढाव, अमोल कोतकर जालिंदर माने, रवींद्र घुगांसे, मच्छिंद्र बर्डे, भाऊसाहेब काळे, किशोर शिरसाठ, विशाल तनपुरे, उमाकांत गावडे, चंद्रकांत कुसळकर, भरत बुधवंत व अरुण मोरे यांनी केली.