भीमाशंकर परिसरातील पाभे गावात पाणी शिरण्याची परिस्थिती

भीमाशंकर: भीमाशंकर परिसरातील पाभे गावात पाणी शिरण्याची परिस्थिती निर्माण झाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

गेली आठ दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीला पूर येत आहे .मागील दोन दिवसांपासून यापरिसत अतिवृष्टी झाली आहे.त्यामुळे आलेल्या पुराचे पाणी गावात घुसण्याची स्थिती निर्माण झाली आहे.पाभे गावात जाणारा रस्ता बंद झाला आहे.

खेड तालुक्यातील  पाभे गावाजवळील  पूल कम बंधा-यात उन्हाळयात पाणी साठा केला जातो.बंधाऱयाला लावलेले ढापे पावसाळ्यापूर्वी काढण्यात येतात त्यामुळे नदीचा प्रवाह सुरळीत होतो यावर्षी प्रशासनाने पुलाचे खालील दोन थराचे ढापे काढले नसल्याने भीमानदीला पूर आल्याने पाण्याचा फुगवटा वाढला. पाभे गावात पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेली तीन दिवसांपासून ही परिस्थिती कायम असल्याने ग्रामस्थामध्ये भीतीचे वातावरण आहे. अजून मोठा पाऊस झलयास गावात पाणी शिरण्याची भीती आहे तर या पुलाला मोठा धोका आहे

भोरीगिरी भीमाशंकर परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे  भीमानदीला मोठा पूर आला आहे. पूर आल्याने पुराचे पाणी पाभे गावाला लागले आहे. गावात पाणी घुसण्याचा धोका निर्माण झाला प्रशासनानाकडून याबाबत दखल घेतली जात नाही. पावसाचा जोर वाढत असून या घटनेकडे तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापनेचे मोठे दुर्लक्ष झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.