देहुरोड – देहुरोड रेल्वे क्वॉर्टर येथे नराधम भावाकडून सख्ख्या अल्पवयीन बहिणीवर गेल्या पाच वर्षांपासून अत्याचार केला जात असल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला असून यातील आरोपी फरार झाला आहे.
पीडित मुलगी इयत्ता चौथीत असल्यापासून (सप्टेंबर 2014 ते 1 सप्टेंबर 2019 अखेर) अद्यापपर्यत घरात कोणी नसताना घरात, शौचालयात, रेल्वे रूळाजवळ तसेच मोकळ्या मैदानावर वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केले. पीडित मुलीचे वडील दारू पित असल्याने मारण्याच्या भीतीने तिने काही सांगितले नाही. दरम्यान, या कृत्याने परिसरात खळबळ उडाली आहे.