कामगाराचा मृत्यू; ठेकेदारावर गुन्हा

पिंपरी – सुरक्षा विषयक साधने कामगारास न देता त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पुनावळे येथे वाधवानी ग्रुपच्या बांधकाम साईटवर घडली होती.

संदीप शंकर सपकाळ (वय 45, रा. शिवपार्क सोसायटी, हडपसर, पुणे) असे मृत्यूमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. उमेश मधुकर पाटील (रा. तुकाईनगर, हडपसर, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. के. राठोड यांनी बुधवारी (दि. 4) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास पुनावळे येथे वाधवानी ग्रुपच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू होते. त्यावेळी आरोपी उमेश पाटील याने कामगारांना सुरक्षिततेची साधने उपलब्ध करून दिली नाही. यामुळे बांधकाम साईटवरून पडल्याने संदीप सपकाळ हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वीरेंद्र चव्हाण याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.