पुणे : शहरात मागील चार दिवसांपासून पाऊस सुरु आहे. तसेच घाट माथ्यावर पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे सिंहगड किल्ल्यावर पायथ्यापासून सिंहगडाकडे जाणाऱ्या 9 किमीच्या मार्गाला खडक कोसळण्याच्या भितीने पुणे वनविभागाने जिल्हा प्रशासनाला पत्र लिहिले आहे. त्यात सिंहगड किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना 16 जुलैपर्यंत बंदी घालण्याची या पत्रातून विनंती केली आहे.
मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र लिहिले आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी, किल्ल्याला भेट देण्यास तात्पुरती बंदी आवश्यक आहे, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
घाट परिसरातील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी आम्ही अधिक स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे, विशेषत: वीकेंडला जेव्हा हजारो पर्यटक असतात. या व्यतिरिक्त, प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आम्ही या स्थानांवर अतिरिक्त सावधगिरीची चिन्हे ठेवत आहोत. किल्ल्याकडे जाणार्या घाट विभागात किमान आठ ठिकाणी खडक पडण्याची शक्यता आहे.