लंडन – भारताची अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामीने इंग्लंडविरुद्ध तिच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळला. दोन दशकं भारतीय महिला संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या झुलन गोस्वामीने जागतिक क्रिकेटमध्ये अनेक मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. या सामन्याला काहीच तास शिल्लक असताना बीसीसीआयने झुलन गोस्वामीचा एक व्हिडिओ शेअर केला.
For one last time 📸
Picture perfect moments from Lord’s for @JhulanG10 the legend 🌟#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/auLFA0d3hR
— BCCI Women (@BCCIWomen) September 24, 2022
यात झुलन गोस्वामीने “भारतीय संघाची जर्सी घालून देशाचे राष्ट्रगीत गाणं, हे माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण राहतील, ( Singing India’s National Anthem and wearing the India jersey will always remain the best moments in my life : Jhulan Goswami) असे म्हटले आहे.
For over 20 years Jhulan Goswami has run in, hit a length and blazed a trail.
She has bowled nearly 10,000 balls in ODI cricket, and she may just have inspired as many young girls to try cricket.
Thanks @JhulanG10, you’re an inspiration. pic.twitter.com/EMeCtAA5Wa
— England Cricket (@englandcricket) September 24, 2022
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात झुलन गोस्वामी फलंदाजीसाठी मैदानावर उतरली असताना तिला “गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. लॉर्डस मैदानावर उतरत असताना भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंनी दोन्ही बाजूंनी रांग करत तिचा सन्मान केला.
💬 💬 Singing India’s National Anthem and wearing the India jersey will always remain the best moments in my life: @JhulanG10 #TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/SHpjRyL1Hn
— BCCI Women (@BCCIWomen) September 24, 2022
झुलन गोस्वामीने आतापर्यंत 12 कसोटी, 203 एकदिवसीय आणि 68 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तिने कसोटीत 44, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 253 आणि टी-20 क्रिकेटमध्ये 56 विकेट्स घेतल्या आहेत. महत्वाचं म्हणजे, ती एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1000 पेक्षा अधिक धावा आणि 200 पेक्षा अधिक विकेट्स घेणारी एकमेव खेळाडू आहे.