भारतीय महिला संघाची माजी दिग्गज वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने ( Jhulan Goswami ) नुकतीच क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. झुलनने तिचा शेवटचा सामना लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर इंग्लंडविरुद्ध खेळला. भारतीय संघाने त्या सामन्यात विजय मिळवून तिला विजयी निरोप दिला होता. झुलन गोस्वामीने तब्बल दोन दशके भारतासाठी क्रिकेट खेळले आहे. यादरम्यान तिची कारकीर्द खूपच चढ-उतारांची राहिली. त्यामुळे झुलनच्या आयुष्यावर लवकरच चित्रपट येणार आहे. महत्वाचे म्हणजे या चित्रपटामध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा मुख्य भूमिका साकारणार आहे.
पाकिस्तान संघ वर्ल्डकपमधून बाहेर पडणार? ‘या’ कारणामुळे PCB ने दिले संकेत
चकडा ‘एक्सप्रेस’ नावाने निर्माण होणाऱ्या या चित्रपटात झूलन गोस्वामीचे ( Jhulan Goswami ) वैयक्तिक आयुष्य आणि तिची क्रिकेट कारकीर्द दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटातील काही दृश्यांची शुटिंग इंग्लंड येथे करण्यात आली आहे. त्यानंतर आता भारतात कोलकातातील ईडन गार्डन्स या मैदानावर चित्रपटाच्या शुटिंगचे काम सुरू आहे. या शुटिंग दरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये अनुष्का शर्मा ही झुलन गोस्वामीच्या वेशभूषेत म्हणजे भारतीय महिला संघाच्या जर्सीत दिसत आहे.
The reel Jhulan Goswami – Anushka Sharma.
Chakda Xpress loading!! #CricketTwitter pic.twitter.com/sGYNz1Wr0O
— Female Cricket (@imfemalecricket) October 18, 2022
भारतीय महिला क्रिकेटसाठी झुलून गोस्वामीने ( Jhulan Goswami ) खूप मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे तिच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाची सर्वच क्रिकेट चाहत्यांना आतुरता लागलेली आहे. यापूर्वीही क्रिकेटमधील अनेक खेळाडूंवर आधारित चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाची माजी कर्णधार मिताली राज हिच्या आयुष्यावर आधारित ‘शाबास नितू’ नावाच्या चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री तापसी पन्नू ही मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली होती.