ओकुहाराकडून सिंधू उपांत्य फेरीत पराभूत

सिंगापूर – भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचे मलेशिया ओपन मधील आव्हान जपानच्या नाओमी ओकुहारा कडून संपुष्टात आले. रिओ ऑलिम्पिकची रौप्य विजेती सिंधू एकतर्फी लढतीत तिसरी मानांकित जपानच्या ओकुहाराकडून 7-21, 11-21 ने पराभूत झाली.

या सामन्यात सिंधू पूर्णपणे ऑफफॉर्म जाणवली. सामन्यात 15 मिनिटानंतर तिने अनेक चुका केल्या. त्यातच पहिला गेम गमवावा लागला.आता ओकुहाराची लढत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली चायनीज तैपईची वाय जू यिग हिच्याविरुद्ध होईल. जू यिगने अकाने यामागुचीवर 15-21, 24-22, 21-19 ने विजय साजरा केला.

मागच्या दोन सामन्यात सिंधूने ओकुहारावर विजय नोंदविला होता. मात्र, या पराभवामुळे जय-पराजयाचे अंतर 7-6 असे झाले. या दोन खेळाडूंदरम्यान 2017 च्या विश्व चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 110 मिनिटे रंगला होता. बॅडमिंटनच्या इतिहासात महिला एकेरीच्या सर्वोत्कृष्ट लढतींपैकी ती एक लढत मानली जाते. या मॅरेथॉन अंतिम सामन्यानंतर सिंधू-ओकुहारा सहावेळा परस्परांपुढे आल्या. सिंधूने त्यात चारवेळा बाजी मारली.

Leave A Reply

Your email address will not be published.