संजय लीला भंसालीच्या चित्रपटात झळकणार आलिया

बॉलीवूडमधील अभिनेत्री आलिया भट्‌ट सतत कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिला फिल्मफेअर अवॉर्ड जाहिर करण्यात आला. तसेच ती “कलंक’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असून रणवीर कपूरसोबत “ब्रह्मास्त्र’चेही शुटिंग सुरू आहे. याशिवाय तिच्यासाठी आणखी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, संजय लीला भंसाली यांच्या चित्रपटात भाईजान अर्थात सलमान खानसोबत झळकणार आहे.

एका मुलाखतीत आलिया म्हणाली, सलमान यांच्या अनुभवातून मला चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. तसेच संजय लीला भंसाली हे दूरदर्शी आहेत. सलमानसोबत कास्टिंग करण्यामागेही अनेक कारणे असून त्याच्यासोबत काम करण्यासाठी मी खूपच उत्साही आहे. मी कधी विचारही केला नव्हता की, मी सलमानसोबत काम करेन. सलमान आणि एसएलबी जेव्हा एकत्रित असतात तो क्षण खूपच रोमांचीत करणारा असतो.

दरम्यान, “कलंक’ चित्रपटाचे दिल्लीत प्रमोशन केल्यानंतर आलिया मुंबईला परतली. त्यानंतर लगेच “ब्रह्मास्त्र’चे शुटिंग करणार आहे. याशिवाय ती “सडक-2’मध्ये पहिल्यांदा आपल्या वडीलांसोबत काम करणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.