sidhu moose wala । दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांचे पालक लवकरच त्यांच्या कुटुंबात नवीन सदस्याचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. मूसवालाची आई चरण कौर गरोदर असून लवकरच त्या मुलाला जन्म देणार आहे. या बातमीला त्यांच्या कुटुंबीयांनी दुजोरा दिला आहे.
सिद्धू मूसवाला हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता आणि 2022 मध्ये त्यांची हत्या झाल्यानंतर त्याचे आई-वडील एकटे पडले होते. अशात दोघांनीही आयव्हीएफच्या मदतीने पुन्हा पालक होण्याचा निर्णय घेतला.
29 मे 2022 रोजी सिद्धू मूसवालाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. तो त्याच्या कारमध्ये होता आणि त्याच्यावर गोळ्या झाडून त्याचा मृत्यू झाला. त्याच्या हत्येने त्याचे कुटुंब उद्ध्वस्त झाले होते. मूसवाला यांच्या वडिलांनी घोषणा केली होती की ते त्यांच्या मुलाची पुढील अनेक वर्षे बाकीची गाणी रिलीज करणार आहेत. असेच झाले, सिद्धूच्या मृत्यूनंतरही त्यांची गाणी रिलीज होत आहेत.
त्यानंतर त्याचे आई-वडील पूर्णपणे एकटे पडले होते. आता त्यांनी आयव्हीएफच्या मदतीने बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे सकारात्मक परिणाम मिळाले. मार्चमध्ये या कुटुंबाकडे एक छोटा पाहुणे येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्याच्या पालकांनी याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही. तरुणांमध्ये सिद्धू मूसवालाची क्रेझ अजूनही तशीच आहे. मूसवाला स्वतःची गाणी लिहित आणि संगीतबद्ध करत. ते सर्वात श्रीमंत पंजाबी गायकांपैकी एक मानले जात होते. त्याच्या हत्येनंतरही त्याची अनेक गाणी रिलीज झाली आणि हिट झाली.
मूसवाला यांचे वडील बलकौर सिंह भटिंडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, अशी अटकळ आहे. मात्र, राजकारणात प्रवेश केल्यानंतर काहीही बदलणार नाही, असे ते म्हणाले होते. अलीकडेच चरण कौर यांनी ‘दिल्ली चलो’ आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी सोशल मीडिया हँडल पोस्ट लिहिली होती. खनौरी सीमेवर मारले गेलेले शेतकरी शुभकरन सिंह यांना न्याय देण्याची मागणी केली होती.