रंग दे बसंती मधील ऍक़्टर सिद्धार्थचा मोबाइल नंबर मध्यंतरी लीक झाला आणि या लीक झालेल्या मोबाइल नंबरवर त्याला मारण्याच्या धमक्या दिल्या जायला लागल्या आहेत. सिद्धार्थने आपला मोबाइल नंबर लीक केल्याबद्दल तमिळनाडूच्या भाजप आयटी सेलला जबाबदार धरले आहे.
सिद्धार्थने याला राजकारणाचा एक भाग मानले आहे. तमिळनाडूमध्ये अलीकडेच निवडणुकांच्या वातावरणात कोविड-19 विरोधात केंद्र सरकार अपयशी ठरल्याची टिप्पणी सिद्धार्थने केली होती. त्याच्या या वक्तव्यावर नाराज होऊन भाजपनेच त्याचा मोबाइल नंतर लीक केल्याचा आरोप त्याने केला आहे.
हा आरोप करणाऱ्या ट्विटला त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनाही टॅग केले आहे. मोबाइल व्यतिरिक्त सोशल मीडियावरूनही सिद्धार्थला ट्रोल केले जाऊ लागले आहे. त्याने या सगळ्याविरोधात पोलिसांकडे तक्रार देखील केली आहे. “रंग दे बसंती’मध्ये आमिर खान आणि आर. माधवनच्या बरोबर सिद्धार्थदेखील दिसला होता.