अनुष्का शर्माने दिली होती “3 इडिएटस’ची स्क्रीन टेस्ट

आमिर खानचा “3 इडिएट्‌स’ची लोकप्रियता प्रचंड होती. या सिनेमासाठी अनुष्का शर्मानेही स्क्रीन टेस्ट दिली होती, हे फार कमी जणांना माहिती असेल. मात्र, अनुष्का शर्माचा एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून ही गोष्ट स्पष्ट होते आहे. या व्हिडिओमध्ये अनुष्का “मुन्नाभाई एमबीबीएस’मधील ग्रेसी सिंगने म्हटलेला एक लांबलचक डायलॉग म्हणताना दिसते आहे.

“3 इडिएट्‌स’मध्ये आमिर खान, आर. माधवन, शर्मन जोशी, बोमन इराणी, करीना कपूर इतकी मोठी स्टारकास्ट होती. बोमन इराणी तर “मुन्नाभाई…’मध्येही होते. यातील करीनाच्या रोलसाठी अनुष्काने ही स्क्रीन टेस्ट दिली होती. पण दुर्दैवाने तिची निवड होऊ शकली नव्हती.
त्यानंतर 5 वर्षांनी म्हणजे 2014 मध्ये “पीके’मध्ये अनुष्काला आमिरबरोबर काम करण्याची संधी मिळाली.

गंमत म्हणजे “3 इडिएट्‌स’, “मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि “पीके’ हे तिन्ही सिनेमे विधु विनोद चोप्राचे प्रॉडक्‍शन होते. 2008 मध्ये शाहरुखबरोबरच्या “रबने बना दी जोडी’मधून पदार्पण केलेल्या अनुष्काला “पीके’ने नाव आणि प्रसिद्धी मिळवून दिली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.