पुणे – ‘कॉफी’ प्रत्येकालाच हवीहवीशी आणि आवडणारी असते, कॉफीमुळे दिवसाची सुरुवात तर चांगलीच होतेच पण तुमचा खराब झालेला मूड युद्ध ही ‘कॉफी’ फ्रेश करते. तसंच या वर्षाची सुरुवात अश्याच एका फ्रेश सिनेमाने होणार आहे.
मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशी आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांचा ‘कॉफी’ हा सिनेमा येत्या शुक्रवारी म्हणजे १४ जानेवारीला रिलीज होतोय. या सिनेमात प्रेमाचा ट्रँगल दाखवण्यात आलाय.
View this post on Instagram
स्पृहा जोशी, सिद्धार्थ चांदेकर, आणि कश्यप परुळेकर हे कलाकार या सिनेमात पहायला मिळणार आहेत. अभिनेत्री स्पृहा जोशीने आपल्या इंस्टाग्रामवर या सिनेमाचा ऑफिशल टिझर प्रदर्शित केला आहे.
स्पृहा जोशीने या आधीही उत्तमोत्तम सिनेमे दिले आहेत. तर सिद्धार्थ सुद्धा क्लासमेट, झिम्मा, गुलाबजाम, ऑनलाईन बिनलाईन अशा अनेक सिनेमांमधून मोठ्या पडद्यावर झळकला आहे. दरम्यान, स्पृहा आणि सिद्धार्थचा कॉफी सिनेमा परवा प्रदर्शित होतोय. त्याला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्वाचं असेल.