मराठीतील दिग्ग्ज अभिनेते सचिन पिळगावकर यांची कन्या श्रिया पिळगावकरने कमी कालावधीत हिंदी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. अभिनेता शाहरुख खानसोबत तिने काम केले आहे. याशिवाय नेटफ्लिक्सवर आलेल्या ‘मिर्झापूर’ या वेबसीरिज मधील श्रियाच्या अभिनयला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला. यातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.
श्रिया तिच्या बोल्ड अन् बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. श्रिया सोशल मीडियावरही सक्रिय असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या श्रिया ऑस्ट्रेलियात सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. श्रियाने ऑस्ट्रेलियातील क्वीन्स लँड या ठिकाणचे तिचे फोटो इनस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
क्वीन्स लँडच्या किनाऱ्यावर एंजॉय केल्यानंतर श्रियाने स्कुबा डायविंगही केले. येथे ती मैत्रिणीसह धमाल मस्ती करताना दिसत आहे. यावेळी तिने परिधान केलेल्या बिकिणी लुकने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. श्रियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती समुद्रकिनाऱ्यावर उभी असल्याचे दिसते. सध्या तिच्या या फोटोंवर लाइक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच श्रिया कुटुंबासह मालदीवला गेली होती. येथे सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांचा रोमॅंटिक अंदाजही पाहायला मिळाला होता. त्यानंतर आता श्रिया ऑस्ट्रेलियामध्ये मैत्रिणींसह सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. दरम्यान, श्रियाने अनेक वेबसीरिजमध्ये काम केले आहे. आतापर्यंत ‘फॅन’, ‘हाऊस अरेस्ट’, ‘भांगरा पा ले’ या सिनेमांमध्ये तसेच ‘मिर्झापूर’, ‘द गॉन गेम’, ‘गिल्टी माइंड्स’, ‘द ब्रोकन न्यूज’, ‘क्रॅकडाऊन’ या तिच्या काही गाजलेल्या वेब सीरिजमधून तिने विविध भूमिका साकारल्या आहेत.