मुंबई – अभिनेत्री श्रद्धा कपूर अभिनयासोबतच तिच्या साधेपणामुळे लोकांना आवडते. श्रद्धाचा साधेपणा नेहमीच चर्चेत असतो. डाउन टू अर्थ स्वभाव नेहमीच चाहत्यांना आवडतो. सध्या सोशल मीडियावर तिच्या साधेपणाचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
श्रद्धा कपूरचा एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये ती ऑटोरिक्षातून खाली उतरताना दिसत आहे. तिने जिममध्ये जाण्यासाठी कारचा वापर न करता सर्व सामान्य लोकांसारखे ऑटोने प्रवास केला. हा व्हिडिओ पाहून फॅन्स तिचे कौतुक करत आहे.
रिक्षातून खाली उतरल्यानंतर श्रद्धा कपूर जिममध्ये गेली.आता हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने लिहिले, “सर्वात नम्र अभिनेत्री! डाउन टू अर्थ हा शब्द श्रद्धासाठी लागू होतो. तिला अभिनेत्री असल्याचा गर्व नाही.
सध्या श्रद्धा कपूर तिचा नुकताच रिलीज झालेला ‘तू झुती मैं मक्कर’ या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. हा चित्रपट 2023 मधील सर्वाधिक कमाई करणारा ठरला आहे, आणि रणबीर कपूरसोबतची तिची नवीन जोडी चित्रपट प्रेक्षकांना आवडली होती. विशेष म्हणजे, श्रद्धा कपूरला तिच्या दुसऱ्या चित्रपट आशिकी 2 मधून बॉलिवूडमध्ये बरीच ओळख मिळाली, हा चित्रपट खूप गाजला. यानंतर एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट देऊन श्रद्धा कपूरने इंडस्ट्रीत आपले खास स्थान निर्माण केले आहे.