खुशखबर : उद्या पुण्यात दुकाने उघडणार !

पुणे : शहरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा पहिला टप्पा शनिवारी मध्यरात्री संपत आहे. त्यामुळे उद्या ( रविवार ) पासून शहरातील लॉककडून शिथिल करण्यात येणार आहे. त्यानुसार, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सुधारित आदेश काढले असून रविवारी सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंत अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरू राहणार आहेत.

यामध्ये त्यात, किराणा, भाजी तसेच चिकन, मासे आणि अंडी यांच्या दुकानाचा समावेश असणार आहे. यापूर्वीच्या आदेशात रविवारी ही दुकाने सकाळी 8 ते 12 पर्यंत सुरू ठेवण्यात येणार होती. दरम्यान, सोमवारपासून पुन्हा अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी 8 ते 12 या वेळेतच सुरू असणार आहेत.

तासाभरात बदलण्यात आला आदेश

उद्या लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत महापालिकेत शनिवारी दुपारी बैठक झाली. त्यात लॉकडाऊन एक दिवस वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर तसे आदेशही तयार करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर अचानक हा निर्णय रद्द करत त्याउलट रविवारी दिवसभर एकाच दिवसासाठी अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांना आखडचा शेवटचा रविवार आणि गटारी अमावस्या साजरी करता येणार आहे. मात्र, या आदेशानुसार वाईन शॉप मात्र, 24 जुलै पर्यंत बंदच असणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.