मुंबई – कोरोना व्हायरसचा वाढत फैलाव लक्ष्यात घेता देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन घोषित केला होता. त्यावेळी अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही सेवा सुरू केल्या गेल्या नाही. यादरम्यान, लॉकडाऊनमुळे सिनेसृष्टीतील सर्वच कलाकार आपल्या घरात बसून होते.
मात्र, आता हळूहळू सर्व अनलॉक करताना दिसत आहेत. तसेच राज्य सरकारने चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणास परवानगी दिली आहे. पण त्यासाठी काही नियम आखण्यात आले आहेत. हे सर्व नियम लक्षात घेऊन आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘द कपिल शर्मा शो’चे चित्रीकरण सुरु होणार असल्याचे म्हटले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कपिल शर्मा शोमध्ये बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला गेस्ट म्हणून बोलावण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. राज्यात अडकलेल्या कामगारांना सोनू सूदने आपापल्या राज्यात पोहोचवण्यासाठी मदत केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर सोनू सूद चर्चेत होता. त्यामुळे कपिल शर्माच्या येत्या भागात सोनू सूदला गेस्ट म्हणून बोलवण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.