मुंबई – राणी मुखर्जीने आपली सेकंड इनिंग एकदम दणक्यात खेळायला सुरुवात केली आहे. आई झाल्यानंतर ती आपली मुलगी अदिराकडे अजिबात दुर्लक्ष होऊ देत नाही आहे. काही महिन्यांपूर्वीपर्यंत ती उत्तर युरोपातील एस्टोनिया या देशात निवांत राहात होती.
तिथेच “मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या तिच्या आगामी सिनेमाचेही शूटिंग सुरू होते. तिथले शूटिंग खूपच आव्हानात्मक होते.
करोनाच्या साथीमुळे एस्टोनियातील सरकारने कलाकार आणि तंत्रज्ञांसह केवळ 40 जणांना शूटिंगसाठी परवानगी दिली होती. सर्वसाधारणपणे 200-250 जणांच्या टीमची नेहमी गरज पडते.
त्यामुळे उर्वरित 150 जणांना एस्टोनियामध्येच काम देण्यात आले. त्यात डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी आणि ऍक्शन डायरेक्टरचाही समावेश आहे. या शूटिंगसाठी एस्टोनियात गेलेल्या राणी मुखर्जीने अदिरालाही आपल्याबरोबर नेले होते.
शूटिंगच्या कालावधीत अदिराच्या अभ्यासाची हेळसांड व्हायला नको म्हणून अदिराची ट्युटर, केअर टेकर या सर्व लव्याजम्यालाही बरोबर नेले होते. अदिराच्या
वेळापत्रकानुसार राणीने आपले शूटिंगचे वेळापत्रक जमवून घेतले होते. एस्टोनियाची राजधानी टॅनिन शहरात 90 टक्के शूटिंग पूर्ण झाले आहे. आता उर्वरित 5-10 टक्के शूटिंग मुंबईत केले जाईल.