बॉलीवूडमधील “भाईजान’ अर्थात सलमान खान लॉकडाउनच्या काळात सर्वसामान्यांसह पोलिसांच्या मदतीला धावून आला होता. सध्या सल्लु पनवेल येथील त्याच्या फार्महाउसवर आहे. लॉकडाउनच्या काळात त्याने 3 गाणे रिलीज केले आहे. ज्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. आता सलमान खान एक शॉर्ट फिल्म साकारत असल्याचे समजते.
काही दिवसांपूर्वी सलमान खान आणि जॅकलीन फर्नांडिस या हॉट कपलचे “तेरे बिना…’ हे गाणे रिलीज झाले होते. या गाण्याला रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. हे गाणे पाहिल्यानंतर असे वाटत नाही की लॉकडाउनच्या काळातही लिमिटेड रिसोर्सेसमध्ये हे गाणे शूट करण्यात आले. त्यावेळी असा अंदाज वर्तविला जात होता की सलमानने दरम्यनच्या काळात चित्रपटाचेही शूटिंग केले असावे.
दरम्यान, आता सलमान खान एका शॉर्ट फिल्मच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात सलमानचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी असल्याचे सांगितले जात आहे. लॉकडाऊनमधील फार्महाऊसवर शूट केलेल्या गाण्यात जॅकलिन फर्नांडिस दिसली.
आता या शॉर्ट फिल्ममध्ये वलुशा डिसूझा महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याचे समजते. सलमानच्या यूट्यूब वाहिनीवर त्यांची “तेरे बिना’, “भाई भाई’ आणि “प्यार करोना’ ही तीन गाणी रिलीज झाली आहेत.