मुंबई – चित्रपट फक्त त्यांच्या अॅक्शन आणि रोमान्ससाठी चालतात. अशा परिस्थितीत बोल्ड सीन्सचा टेम्पर त्यांना गती देण्याचे काम करतो. लोकांचे मनोरंजन करण्यासाठी अभिनेत्रींनाही अनेक बोल्ड सीन्स द्यावे लागतात. रोमँटिक सीन शूट करणे इतके सोपे नसते. चला जाणून घेऊया अशाच एका बॉलीवूड स्टारबद्दल ज्याने रोमँटिक सीन शूट करताना केली होती लाईन क्रोस
‘दयावान’ या चित्रपटात माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांनी अनेक रोमँटिक आणि किसिंग सीन दिले होते. ज्यामुळे आजही हा चित्रपट चर्चेत असतो. १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील माधुरी आणि विनोद खन्ना यांच्या किसिंग सीनमुळे खळबळ उडाली होती. माधुरीचा ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्यासोबतचा तो सीन चर्चेचा विषय ठरला होता.
दयावान चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटात माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांच्यात किसींग सीनचे शूट सुरू होते त्याचदरम्यान विनोद खन्ना यांनी माधुरी दिक्षितच्या ओठांचाच चावा घेतल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे दिग्दर्शकाच्या सुचनेकडेही विनोद खन्ना यांचे लक्ष गेले नाही. कट म्हटल्यानंतरही विनोद खन्ना यांनी स्वतःला सावरले नव्हते. आणि याच कारणामुळे ‘दयावाननंतर’ माधुरीने कधीच विनोद खन्नासह सिनेमात काम केले नाही.