…म्हणून अविवाहित चित्रपट दिग्दर्शकाची आई-वडिलांनीच केली हत्या; शरीराचे छोटे-छोटे तुकडे करून फेकले कचऱ्यात

तेहरान – इराणी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक बाबाक खोरमदीन यांच्या आई-वडिलांनी आपल्या मुलाचीच हत्या केली आहे. या हत्येमागील कारण अगदीच क्षुल्लक आहे. बाबाक यांचे वय 47 वर्षे होऊनही त्यांनी आतापर्यंत लग्न केले नव्हते.

त्यावरुनच त्यांचा आई-वडिलांसोबत घरात वाद सुरु होता. अर्थात आई-वडिलांशी कधीतरी वाद होणे, ही सर्वसामान्य गोष्ट आहे. मात्र, बाबाकच्या आई-वडिलांनी हा वाद इतका टोकाला नेला की त्यांची थेट हत्या केली. ते फक्त हत्या करुन थांबले नाहीत तर त्यांनी बाबक यांच्या शरीराचे छोटे-छोटे तुकडे केले आणि ते सुटकेसमध्ये भरुन कचऱ्यात फेकले.

तेहरान क्रिमिनल कोर्टाचे प्रमुख मोहम्मद शहरियारी यांनी याबाबत माहिती दिली. बाबाक खोरमदीन यांच्या वडिलांनी आपला गुन्हा कबूल केला आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांनी आधी मुलाला एनेस्थेशियाचं इंजेक्‍शन दिलं.

त्यानंतर चाकू खुपसून हत्या केली. त्यानंतर त्याच्या शरीराचे तुकडे करुन फेकून दिले, असा कबुली जबाब बाबाक यांच्या वडिलांनी दिला. या जबाबानंतर पोलिसांनी बाबाक यांच्या आई-वडिलांना अटक केली

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.