मेलबर्न – इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियादरम्यान होणाऱ्या ऐतिहासिक ऍशेस मालिकेचे वेळापत्रक क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केले आहे. ही मालिका यंदा 8 डिसेंबरपासून सुरू होणार असून, 26 वर्षांत प्रथमच अंतिम सामना सिडनीऐवजी पर्थ येथे खेळला जाईल.
पहिला सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळला जाईल. यावेळी मालिकेचा चौथा सामना सिडनी क्रिकेट मैदानावर, तर अंतिम सामना पर्थ येथे होईल. ऍशेस मालिकेचे सामने पर्थ, ब्रिस्बेन, ऍडलेड, मेलबर्न आणि सिडनी येथे होतील.
ऍशेस मालिकेपूर्वी अफगाणिस्तान संघ ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. दोन्ही संघांमधील एकमेव कसोटी सामना 27 नोव्हेंबरपासून खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलिया प्रथमच अफगाणिस्तानविरुद्ध खेळेल.
अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी आणि ऍशेस मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ न्यूझीलंड आणि श्रीलंका विरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय सामने खेळणार आहे.
तसेच ऑस्ट्रेलियाचा संघ न्यूझीलंड विरुद्ध तीन एकदिवसीय सामने आणि एक टी-20 सामना खेळेल, तर श्रीलंकेविरुद्ध पाच टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे.