छत्रपती संभाजीनगर – मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून, राज्यभरात आंदोलन केले जात आहे. दरम्यान, याचवेळी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील काही दिवसांत अनेकांनी टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले आहे.
मराठवाड्यात एकाच दिवशी तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जालना येथील अंतरवाली टेंभी गावातील शिवाजी किसन माने (वय 45 वर्षे), छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आपतगाव येथील गणेश काकासाहेब कुबेर (वय 28 वर्षे) आणि हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील देवजना लहू उर्फ कृष्णा यशवंतराव कल्याणकर (वय 25 वर्षे) यांनी आपले जीवन संपवले आहे.