वाशिम – मागील काही दिवसांपासून गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेकदा आपण संपत्तीच्या वादामुळे बाप-लेकांमध्ये वाद झाल्याचं ऐकलं आहे. मात्र लग्नचा विषय बापाची हत्या करण्यासाठी कारणीभूत ठरणं धक्कादायक आहे. अशीच धक्कादायक घटना विदर्भातील वाशिम जिल्ह्यातून समोर आली आहे.
वाशिम जिल्ह्यातील जऊळका येथे एका तरुणाने आपल्या वडिलांची निर्घृणपणे हत्या केली आहे. शुक्रवारी रात्री आरोपी मुलाने कुऱ्हाडीने वार करत आपल्या जन्मदात्या पित्याला संपवलं.
जऊळका येथील पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून हत्येचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. धर्मा भारती असं हत्या झालेल्या वडिलांचं नाव असून प्रमोद भारती असं अटक केलेल्या मुलाचं नाव आहे.
दरम्यान प्रमोदला अनेक व्यसन होती. त्यातच तो काहीच काम करत नसल्याने वडील धर्मा हे मुलाचं लग्न लावून देत नव्हते. हाच राग मनात धरून प्रमोदने वडिलांची हत्या केली.