पुणे – विवाहानंतर सासरी नांदत असताना एका महिलेस दाेन मुली झाल्याचे कारणावरुन तसेच मुलगा हाेत नसल्याचे सांगत सासरच्या व्यक्तींनी तिचा शारिरिक व मानसिक छळ सुरु केला. मुलगा हाेण्याकरिता एका साधुला गाठत त्याच्याकडे जादुटाेणा करवुन घेत अंगारा घेऊन ताे महिलेच्या अंगावर लावण्यासाठी तिला विवस्त्र केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
याप्रकरणी पिडित महिलेने तक्रार दिल्यानंतर महिलेचा पती व सासु (रा.चाकण,पुणे) यांच्यासह कामशेत येथील एका खेडेगावातील साधुवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित पिडित महिलेचा विवाह चार वर्षापूर्वी झाला असून ती सासरी नांदत असताना तिला दाेन मुली झाल्या. मात्र, त्यानंतरही लग्नात महिलेच्या आईवडीलांना याेग्य ताे मानपान केला नसल्याचे सांगत पतीने तिला वेळाेवेळी हाताने, लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्यानंतर पती व सासु यांनी कामशेत येथील एका खेडेगावात तिला नेवुन त्याठिकाणी साधु महाराज समाेर बसवुन तिला मुलगा हाेत नसल्याचे सांगितले.
साधु महाराजाने त्याठिकाणी हातामधील कवडया जमीनीवर टाकुन हिशाेब केल्याचे हातवारे करुन महिलेस मुलगा हाेण्यासाठी अंगारा खाण्यास दिला. तसेच काही अंगारा कागदात बांधुन घरी जाऊन विवस्त्र हाेऊन लावण्यास दिला. त्यानुसार घरी गेल्यानंतर महिलेच्या सासरे कुटुंबियांनी घरी आल्यावर तिला संपुर्ण कपडे उतरविण्यास सांगुन, तिचे अंगावर साधु महाराजांनी दिलेला अंगारा, हळद-कुंकु लावुन तिचे मनास लज्जा उत्पन्न हाेईल असे कृत्य केले आहे. याबाबत चाकण पाेलीस पुढील तपास करत अाहे.